Labels

Friday 17 January 2014

About Time(2013)



                               
  सर्वांना रोजचं आयुष्य जगताना अनेकदा अस वाटत राहत कि जर मला भूतकाळात जाऊन काही गोष्टी बदलत्या आल्या असत्या तर ,जर मला भूतकाळात जाऊन काही क्षण पुन्हा-पुन्हा जगता आले असते तर ,जर मला भूतकाळात जाऊन काही चुकलेले नाती पुन्हा जुळवता आली असती तर ..  याच संकल्पनेवर आहे हा सिनेमा .. Richard Curtis याने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा एक उत्तम सिनेमा बनलाय आणि तो मनाला स्पर्श करून सुखद अनुभव देऊन जातो .. 

                             यातला नायक असतो टिम (Domhnall Gleeson) .. एक साधा मध्यमवर्गीय घरात वाढलेला मुलगा जो प्रेयसी मिळावी म्हणून खटाटोप करत असतो ,पण जस सर्व मुल नेमक मुलींसमोर अशा चुका करतात ज्या मुळे मुलीसमोर इम्प्रेशन चांगल होण्याऐवजी बिघडते तसा हा बिचारा पण करत असतो आणि प्रेमाच्या शोधात दिवस घालवत असतो .. त्याचे वडील एक रहस्य सांगतात ज्यावर हा सिनेमा आधारित आहे .. त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून पुरुषांकडे एक खास शक्ती असते ती म्हणजे भूतकाळात जाऊन परत येण्याची .. झालं मग सुरु होते नायकाची धमाल ,नंतर त्याच्या आयुष्यात येते मेरी(Rachel McAdams) ,त्याच आयुष्यभराच खर प्रेम .. मग तो तिला पटवण्यासाठी भूतकाळात वारंवार जाऊन अनेक क्लुप्त्या करून शेवटी तिला मिळवतो व यापुढ टिम चा संघर्ष सुरु होतो ,ज्यात टिम त्याच रोजच आयुष्य जगताना कस जगतो ,त्याच्या प्रेमाला तो कसा सांभाळतो ,वडिलांबद्दल असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या शेवटच्या क्षणांना सुद्धा भूतकाळात जाऊन त्यांच्यासोबत काही क्षण जगण्यासाठी त्याची धडपड .. 
                            पूर्ण सिनेमा पाहताना सारख वाटत राहत कि हा सिनेमा कुठेतरी आपल्याच रोजच्या जगण्यासारखा आहे .. आपल्याला रोजच वाटत राहत कि अरे मी हे नको करायला हव होत ,किवा अरे मी हे नको बोलायला हव होत किवा मी ते केल नसत तर आज माझ आयुष्य किती वेगळ असतं .. पण आपण भूतकाळात नाही जाऊ शकत .. खर प्रेम ,खरी माणस ,खरखुर जगण याची आपण किंमत च ठेवत नाही ,सगळ्यांना आपण गृहीत धरून चालतो आणि मग जेव्हा याच गोष्टी आपल्यापासून दुरावतात तेव्हा याचं किंमत आपल्याला समजायला लागते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ..  म्हणुन तर खर आयुष्य जगण्याची मजा आहे तो येणारा प्रत्येक दिवस ,प्रत्येक क्षण हा पुन्हा नाही येणार याच भान ठेऊन जगण्यात  .. शेवटला टिमचे हे वाक्य अगदी सूचक आहे कि "I just try to live everyday as if I've deliberately come back t this day to enjoy it as if it was full final day of my life"..